औरंगाबाद, १७ डिसेंबर २०२३ : फुलंब्री (जि. औरंगाबाद) येथील गेवराई पायगा येथे आज पहिली महिला ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेमध्ये महिला सशक्तीकरण; तसेच पंधराव्या वित्त आयोगामध्ये महिलांसाठी येणाऱ्या विशिष्ट योजना तसेच संपूर्ण महिलांच्या मागणीस्तव गावात दारूबंदी, गुटखाबंदी, सिगारेट व इतर नशायुक्त पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. जर नशायुक्त पदार्थांची विक्री करताना विक्रेता आढळून आल्यास त्यासाठी पन्नास हजार रुपये दंड ठेवण्यात आला आहे.


आदर्श गाव योजनेकडे वाटचाल करायची म्हणून गावात होणाऱ्या विविध विकासकामांमध्ये जो अडथळा निर्माण करेल त्याला कुठलाही शासकीय लाभ मिळणार नाही, असाही निर्णय ग्रामसभेमध्ये एकमताने घेण्यात आला.
यावेळी बैठकीला सरपंच मंगेश साबळे, ग्रामसेवक राठोड, उपसरपंच कचरू जनार्दन पा. साबळे, बाबूराव पा. वाडेकर, कविताताई वाघ, पोलिस पाटील पंढरीनाथ जयतमाल, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान पाटील साबळे व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य; तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले