बारामती, दि.१४ मे २०२०: बारामती शहरात पत्र्याच्या शेडमध्ये चालविले जाणारे अनधिकृत कत्तलखाने प्रशासनाने सील केले आहेत.नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करीत बुधवारी (दि.१३) दुपारी येथील शेड सील केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर हि कारवाई करण्यात आली.
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून संपूर्ण राज्यात संपूर्ण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्याची १७ मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.बारामती नगरपरिषद
हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात क-हा नदी स्मशानभूमी रिंगरोड पुलापासून ते देवळे इस्टेट कुरेशीवस्ती गावडे हॉस्पिटल पर्यंत कासन हसन कुरेशी (रा.खाटीकगल्ली), मानुद्दीन मुबारक कुरेशी (रा.देवळे इस्टेट, बारामती ,
सलाम इसाक कुरेशी (रा.म्हाडा कॉलनी , बारामती),समदहाजी बकस कुरेशी (रा. म्हाडा कॉलनी,बारामती), आसिफ मुस्तफा कुरेशी (रा.म्हाडा कॉलनी बारामती) ( जावेद हारून कुरेशी रा.म्हाडा कॉलनी बारामती) यांनी अनधिकृत पत्राशेड टाकलेली आहेत.
या अनधिकृत पत्राशेडच्या ठिकाणी अनधिकृत कत्तलखाने चालू आहेत. त्यामुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरत आहे. आरोग्य घातक परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे अनधिकृत पत्राशेड सील करण्याचे आदेश मुख्याधिकारी कडुसकर यांनी दिले. त्यानुसार बारामती नगरपरिषदेचे आरोग्य
निरीक्षक राजेंद्र सोनवणे, सुभाष नारखेडे, अजय लालबिगे, सहायक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले, जागाभाडे विभाग प्रमुख सुनील धुमाळ, अतिक्रमण
विभाग प्रमुख संतोष तोडकर,योगेश लालबिगे,बळवंत झुंज यांच्यासह अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव