त्रिपुरा, १८ जून २०२० : क्रिकेटसाठी बुधवारी त्रिपुरा येथून एक दुःखद बातमी समोर आली. येथे १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाची खेळाडू अयंती रींग हिने गळफास लावून आत्महत्या केली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, १६ वर्षांच्या या खेळाडूने हे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही. यावेळी तिथे कोणतीही सुसाइड नोटही सापडली नाही.
रेंग जमातीतील अयंती हिचे कुटुंब राजधानी अगरतलापासून ९० कि.मी. अंतरावर उदयपूरच्या तेनानी गावात राहते. ४ भावंडांपैकी ती सर्वात धाकटी होती.
राज्याने आशावादी आणि हुशार खेळाडूला गमावले , तसेच राज्याकडून अंडर २३ टी -२० स्पर्धेत ती खेळली होती. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी तैमुरा चंदा यांनी अयंती हिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असे म्हटले आहे की, राज्याने एक प्रतिभावान व हुशार खेळाडू गमावला आहे. या वृत्तामुळे तीव्र धक्का बसला आहे.
तैमिर चंदा म्हणाले की, लॉकडाऊनच्या दरम्यान आमच्याकडे ऑनलाईन वर्गही होते. तथापि, त्याच्या कौटुंबिक समस्येबद्दल जास्त माहिती नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी