पुणे, २४ ऑक्टोबर २०२० : कोरोना लॉकडाऊन नंतर सर्व सार्वजनिक सेवा हळूहळू सुरू होत आहेत. पुण्यातील पीएमपीएमएल बसची सेवा ही आता सुरू झालेली आहे. पुण्यात सर्व मार्गांवर बससेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे.
गोखले नगर ते कात्रज व गोखलेनगर ते पुणे स्टेशन बस सेवा अजूनही सुरू झालेली नाही. ह्या मार्गाची बससेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत भाजप व्यापारी आघाडी (शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष) विकास डाबी यांनी सिद्धार्थ शिरोळे यांना गोखले नगर ते कात्रज व गोखलेनगर ते पुणे स्टेशन बस सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते.
गोखले नगर ते कात्रज व गोखले नगर ते पुणे स्टेशन बस सेवा पूर्ववत करावी, अशा मागणीचे पत्र सिद्धार्थ शिरोळे यांनी पी एम पी एम एल व्यवस्थापनाकडे दिले .
गोखले नगर मधील प्रवाशांना गोखले नगर ते कात्रज व गोखले नगर ते पुणे स्टेशन कडे जाण्यासाठी दोन दोन बस बदलाव्या लागतात. सदरील परिसरातील नागरिकांची यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे गोखले नगर ते कात्रज पुणे स्टेशन बस सेवा त्वरित सुरू करावी ,अशी मागणी पत्राद्वारे सिद्धार्थ शिरोळे यांनी पी एम पी एम एल व्यवस्थापनाकडे केली आहे .
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे