पुणे, 8 फेब्रुवारी 2022: आधार कार्ड बनवताना प्रत्यक्ष फोटो काढला जातो. ई सुविधा केंद्रांवरील कॅमेरा किंवा आधार कार्ड केंद्रांवरील कॅमेरा तितकासा चांगला नसतो जी सोय आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये काढलेल्या कॅमेऱ्यामधून मिळते. त्यामुळं बरेच लोक आपल्या आधार कार्ड वरील फोटो मुळं नाराज असतात. UIDAI आधार कार्डधारकांना आधार कार्डमधील फोटो बदलण्याची सुविधा देते. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया:
आधार कार्ड वरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड केंद्रावर (Aadhaar Seva Kendra )जावं लागंल. याचं कारण असं आहे की, हा बदल करण्यासाठी तुम्हाला biometric authentication ची गरज असते.
तुम्ही आधार सेवा केंद्रासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुम्हाला आधार सेवा केंद्रावर एक फॉर्म भरावा लागेल. आधार सेवा केंद्रात फोटो बदलण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही.
नाममात्र शुल्क भरून आधार कार्डमध्ये फोटो बदलता येतो. यानंतर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक म्हणजेच रेफरन्स नंबर मिळंल. याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकाल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे