अज्ञात हल्लेखोरांनी दाम्पत्याची केली हत्या

जशपूर, दि. २ जुलै २०२०: छत्तीसगड जशपूर जिल्ह्यात एका ३५ वर्षीय व्यावसायिकाची आणि त्याच्या पत्नीची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. छत्तीसगड-झारखंड सीमेवर वसलेल्या आस्ता शहरात बुधवारी रात्री ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आस्ता-जशपूर रोडवर सामान्य दुकान चालवणारे शैलेंद्र सिंह दुकान बंद करून घरी परतले होते आणि घरामागील भाजीच्या बागेत होते. तेव्हा जवळजवळ सहा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती एका स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने दिली.

जेव्हा त्यांनी बचावासाठी ओरडण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची पत्नी संगीता साई (३२) त्यांच्या बचावासाठी आल्या परंतू त्याही हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याचे अधिका-यांनी सांगितले.

त्यांची आरडा ओरड ऐकताच आजूबाजूचे शेजारी त्यांच्या घराजवळ दाखल झाले, त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. जखमींना जशपूरच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

“या हत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. घरातून काहीही गायब झाल्याची नोंद नसल्यामुळे हल्लेखोरांचा उद्देश दरोडा घालणे हा नव्हता. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा