अज्ञात चोरट्यांनी ट्रक चालकास लुटले

मोरगांव, ११ ऑक्टोंबर २०२०: मोरगांव – निरा रस्त्यावर चौधरवाडी गावच्या हद्दीत रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकचालकास तीन अज्ञात तरुणांनी लुटलं असल्याची घटना काल शनिवार दि. १० रोजी घडली. ट्रक चालकाकडुन तीन दुचाकी स्वारांनी धमकावत जबरदस्तीनं पस्तीस हजार रुपये घेऊन गेले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणं शिरूर – सातारा राज्य मार्गावरून सुरजमल जगन्नाथ माली (रा.मोहना, ता. राऊतबाटा ,जि . चितोडगढ,  राजस्थान) हा ट्रकचालक नीरा मोरगाव रस्त्यावरून प्रवास करत असताना चौधरवाडी गावच्या हद्दीत चढावर ट्रक सावकाश असताना तीन अज्ञात तरुणांनी ट्रक चालकास अडवून आम्ही पोलीस आहोत. तुमच्या ट्रकमध्ये गांजा अफु आहे काय आम्हाला तपासणी करायची आहे. असं सांगत चौधरवाडी गावच्या हद्दीतील फॉरेस्ट शेजारी गाडी बाजुला ऊभी करण्यास सांगीतलं.

मग चालकास दमदाटी करून त्याच्याकडील असणारे डीझेलसाठी ठेवलेले पैसे लुटले असल्याची घटना काल शनिवारी दुपारी दि. १० रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत प्रकरणी तिघा अज्ञातांविरोधात वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस हवालदार फणसे करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा