केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ७२ तासात, महाराष्ट्रातून कोणाला संधी?

नवी दिल्ली, ८ जुलै २०२३ : राज्यात अजित पवारांनी राजकीय भूकंप घडवून आणून भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत सहभाग घेतला. या विस्तारानंतर शिवसेना भाजप मधील नाराज असलेल्या आमदारांना लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच आता आता राज्यातील या राजकीय घडामोडींदरम्यान देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनंतर केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या ७२ तासात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडण्याची शक्यता आहे.

केंद्राच्या होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये, विशेष बाब म्हणजे आठवड्यापूर्वी भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटालाही केंद्रात एक मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या अगोदर केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय निघाला की शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्री पदे मिळणार असे बोलले जात होते. परंतु आता पवार गटामुळे शिंदेच्या शिवसेनेला राज्यानंतर आता केंद्रात, सत्तेतील भाकरीतील वाटणीला सामोरे जावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यापैकी एक मंत्रिपद हे शिंदे गटाला आणि दुसरे मंत्रिपद हे सत्तेतील नव्या वाटेकरी असलेल्या पवार गटाला मिळणार आहे. इतकेच नाही, तर दोन मंत्रिपद जाणार असल्याची माहिती आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. या पाच पैकी दोन दिग्गजांकडे कॅबिनेट आणि इतर तिघांकडे राज्यमंत्रिपद आहे. यामध्ये नितीन गडकरी, नारायण राणे, भागवतराव कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांचा समावेश आहे.

सध्या केंद्रातील नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातुन
नितीन गडकरी–केंद्रीय वाहतूक मंत्री, (कॅबिनेट), नारायण राणे–सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, (कॅबिनेट),कपिल पाटील–केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री,भागवतराव कराड –केंद्रीय अर्थ राज्यमंत्री,भारती पवार – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री,रावसाहेब दानवे – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून हे मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नव्याने कोणाची वर्णी लागते आणि कोणाला वगळले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा