गोल पोस्ट राष्ट्रीय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना मातृशोक

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना मातृशोक

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर २०२० : गेले ५ महिने देशासह जगावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. या परिस्थितीशी सामना प्रत्येक नागरिक करत असताना योग्य उपाययोजनांसाठी आरोग्यमंत्रालयाची कमान सांभाळणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मातोश्रींचे काल निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या.

डॉ. हर्षवर्धन यांच्या मातोश्रींवर गेल्या अनेक दिवसांपासून हृदयरोगाशी संबंधित उपचार सुरु होते. मातोश्रीचे निधन झाल्याचे हर्ष वर्धन यांनी ट्विटवर सांगितले.

यानंतर देशभरातून त्यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी मातोश्रींच्या निधनाने अतिशय दु:ख झाल्याचे सांगत, मी पृथ्वीतलावावरील सर्वात प्रिय व्यक्तीला गमावल्याचे त्यांनी म्हटलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version