नवी दिल्ली, १५ सप्टेंबर २०२०: येत्या सोमवारी म्हणजे २१ सप्टेंबर रोजी देशभरातील शाळा सुरू होणार आहेत. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शाळांमधील मुलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी रविवारी आपल्या ट्विटर हँडलवर मार्गदर्शक तत्त्वे सामायिक केली. आरोग्य मंत्रालयानं उच्च शिक्षण संस्था आणि स्किल ट्रेनिंग इंस्टिट्यूट यांच्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) जाहीर केली. टेक्निकल प्रोग्राम्सचा अभ्यासक्रम देणाऱ्या या संस्थांना २१ सप्टेंबरपासून लॅब उघडण्याची मुभा देण्यात आलीय.
वर्गातही बसण्याची व्यवस्था बदलली जाईल, असं या मार्गदर्शक सूचनात सांगण्यात आेलं आहे. विद्यार्थी एकमेकांपासून सहा फूट अंतरावर बसतील. म्हणून खुर्ची-टेबलचे अंतर ६ फूट असावं. वर्गातील इतर महत्त्वाच्या कामांमध्ये सामाजिक अंतरांची काळजी घ्यावी लागेल.
टीचिंग फैकल्टी’नं हे लक्षात ठेवलं पाहिजे की, विद्यार्थी आणि शिक्षक शालेय शिक्षण दरम्यान मास्क घालत आहेत. विद्यार्थ्यांना आपापसांत लॅपटॉप, नोटबुक, स्टेशनरी देवाण-घेवाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
कोणाला मिळणार शाळेत जाण्याची परवानग
नवीन नियमानुसार, सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत बोलावलं जाणार नाही तर सध्या ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा पर्याय देण्यात आलाय, त्यांच्याकडं ऑफलाइन वर्गातही शिक्षण घेण्याचा पर्याय आहे. शाळा फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी उघड्या राहतील ज्यांच्याकडं ऑनलाईन शिक्षणासाठी पुरेसं साहित्य उपलब्ध नाही किंवा काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शिक्षणाची पद्धत काय असेल
सध्या कोणत्याही शाळांना किंवा महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्गात शिकवण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. दोघांनाही सध्या ऑनलाईन पद्धतीनंच शिक्षण द्यावं लागेल आणि हाइब्रिड मॉडेल पाळावं लागेल.
लॅब उघडल्या जातील
महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उघडल्या जातील. प्रशिक्षणार्थी सहा फूट अंतरापासून उपकरणे हाताळतील. याव्यतिरिक्त, मर्यादित क्षमतेसह व्यायामशाळा (जिमनोजियम) खुल्या असतील आणि महाविद्यालये आणि शाळांमध्ये जलतरण तलाव बंद केले जातील. शाळांमध्ये, सकाळच्या प्रार्थना संमेलनासाठी परवानगी दिली जाणार नाही. विद्यार्थी आपापसांत कोणत्याही गोष्टींची देवाण-घेवाण करू शकणार नाहीत.
कोणती महाविद्यालये व शाळा सुरू होतील
कंटेनमेंट झोनच्या बाहेर असलेली शाळा व महाविद्यालये सरकारी नियमांनुसार उघडतील. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचा-यांना कॅम्पसमध्ये राहू दिलं जाणार नाही. वृद्ध, गर्भवती माता, उच्च आजार असलेले लोक ज्यांना जास्त धोका आहे, त्यांना कॅम्पसमध्ये बोलावलं जाणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे