केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज.

12

नवी दिल्ली : ३१ ऑगस्ट,२०२० : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना २ ऑगस्ट २०२० रोजी कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. तसेच आज तीन आठवड्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

२ ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होता, जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर १४ ऑगस्टला त्यांची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे.
तसेच पोस्ट कोव्हिड लक्षणे दिसताच त्यांना १८ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .एम्स’चे संचालक आर गुलेरिया यांच्या निगराणीखाली शहा होते. तेरा दिवसांच्या उपचारानंतर अमित शहा यांना घरी सोडण्यात आलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे