पुण्यात आता दुमाजली महामार्ग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

पुणे, १६ सप्टेंबर २०२३ : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केलेल्या प्रकल्पानंतर पुण्यात आता दुमाजली महामार्ग बांधण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. पुण्यात ५० हजार कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. बाणेर येथील युरोकुल युरोलाॅजी इन्स्टिट्यूट येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या रोबोटिक युरोलाॅजी सेंटरचे उद्घाटन, नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी युरोकुलचे संचालक डॉ.संजय कुलकर्णी आणि डॉ.ज्योत्स्ना कुलकर्णी, म्हैसकर फाउंडेशनच्या सुधा म्हैसकर, जयंत म्हैसकर, आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेतून जैवइंधनाच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. लवकरच शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलपासून तयार झालेल्या इंधनावर विमाने उडू शकतील.

बायो-सीएनजी, बायोएलएनजी, इथेनॉल अशी प्रगती आपण साधत आहोत. त्याचप्रमाणे वैद्यकशास्त्रातही वेगाने बदल होत आहेत. डॉ.संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ.ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी रोबोटिक युरोलाॅजी सेंटरची माहिती दिली. बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचे डॉ. राजेश देशपांडे यांनी आभार मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा