महिला, किसान, तरुण, सर्वसामान्य जनता या देशाच्या अर्थव्यवस्थेमधील चारच जाती- केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा

5

फलटण, सातारा ३० डिसेंबर २०२३ : फलटण तालुक्यातील विडनी गावामधे संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी सांगितले की, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चारच जाती आहेत, त्या म्हणजे महिला, किसान, तरुण, सर्वसामान्य जनता. यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास होय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अनेक विकासाच्या योजना तयार केल्या असून भारत हा जगातील आर्थिक महा सत्ते कडे जात असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

फलटण तालुक्यातील विडनी गावातील महिलांना प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते आयुष्मान कार्ड, महिला बचत गट चेक वितरण, संजय गांधी निराधार योजना यासह विविध प्रकारच्या योजनांतील लाभार्थी यांना त्यांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी विकास संकल्प यात्रा, हायटेक गाव याविषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह प्रांत सचिन ढोले पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा