भोकरदनमध्ये केंद्रीय राज्यमंञी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते दशरथबाबा धर्मदाय रुग्णायलाचा शुभारंभ

भोकरदन, १४ मार्च २०२४ : भोकरदन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आज ‘दशरथबाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंञी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यातआला. यावेळेस आ. संतोष दानवे, संजय शर्मा (डी. जी. एम.इरकाॅम इंटरनॅशनल लि.), कौशिक बॅनर्जी (I.R.C.T.C.AGM), श्री निलरतन शेंडे (संस्थापक ईगल लाईवलिहूड फाऊंडेशन), विजय घोलप (अध्यक्ष सावली संस्था), डॉक्टर कृष्णा कोरडे कलावती हाॅस्पिटल जालना, शांताराम माने, संभापती कौतीकराव जगताप, गणेश ठाले, मुकेश चिने, मधुकर दानवे, डाॅ चंद्रकांत साबळे, मधुकरराव मुकटवार, डाॅ. शालीकराम गोरे (प्रशासकीय अधिकारी तथा प्रोजेक्ट हेड), शांताराम माने, डॉ. निखिल घोडके, डॉ. किर्ती प्रसाद कंगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दानवे यांनी दशरथबाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलचा शुभारंभ करून उपलब्ध सुविधांची सखोल माहिती घेऊन पाहणी केली आणि उपस्थित डाॅक्टर यांना सूचना केल्या. तसेच सदरील हाॅस्पिटल हे भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे मंत्रालय उपक्रमातून तालुक्यातील गोरगरीब जनतेला अल्पदरात उपचार आणि आजाराबद्दल योग्य निदान व्हावे म्हणून सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. भोकरदन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभ्या झालेल्या सुसज्ज व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असे अल्पदरात उत्तम सेवा देणारे भोकरदन जाफ्रबाद विधानसभा तसेच परिसरातील पहिले धर्मदाय रुग्णालय सुरु झाले आहे. ग्रामीण भागातील जनतेला अत्याधुनिक आरोग्य सुविधा भोकरदनमध्येच मिळाव्या. या प्रांजळ उद्देशाने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या संकल्पनेतून आकार घेणारे हे रुग्णालय गरजू रुग्णांना मोठा आधार म्हणून उपयोगी पडणार आहे. राईटसद्वारे संचालित कार्डीयाक ॲम्बुलन्सचे लोकार्पण सुद्धा यावेळी करण्यात आले.

दरम्यान आ संतोष दानवे यांनी सांगितले की, आपण आपल्या राहत असलेलेल्या वस्तीत सर्व सुविधा घेतो, आपल्या वाहनांचे नियमित सर्विसिंग करतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीराची सुद्धा नियमित तपासणी व उपचार करण्याची आवश्यकता असते आणि त्याचसाठी हे हाॅस्पिटल आहे. आपण दररोज मोबाईल, मोटारसायकल व इतर वाहनांवर बरेच पैसे खर्च करतो, नियमित वाहनांची सर्विसिंग करतो. तर मग आपण आपल्या शरीराची नियमित काळजी का घेत नाही शरीर हीच संपत्ती लक्षात घेऊन दर सहा महिन्याला, वर्षाला एकदा तरी आपल्या व आपल्या परिवाराच्या शरीराच्या अरोग्य तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. त्यासाठीच अल्पदरात, गोरगरीबासाठी हे हाॅस्पिटल सुरू केले आहे. यासाठी सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असलेली रुग्णवाहिका सुद्धा आहे. तंज्ञ डाॅक्टर, टेक्निशियन, पॅथॉलॉजिस्ट, नर्सेसने सज्ज असे हे हाॅस्पिटल आहे. त्याचा सर्वानीच लाभ घ्यावा असे आवाहन यावेळेस आ संतोष दानवे यांनी केले.

यावेळेस संजय शर्मा, शांताराम माने, डाॅक्टर कृष्णा कोरडे यांनीही दशरथबाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलचे वैद्यकीय उपचाराचे मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डाॅक्टर शालीकराम गोरे यांनी केले. यावेळेस भोकरदन तालुक्यातील व शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा