केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं मोठं वक्तव्य, एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही

8
UAE, 3 ऑक्टोंबर 2021: गेल्या काही दिवसांपासून एअर इंडिया टाटा समूहाकडं परत जाणार अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू होत्या. यावर सरकारने देखील स्पष्टीकरण दिला आहे. तर आता वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणतात की, एअर इंडियाबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.  त्याच वेळी, त्याच्या बोलीतील विजेत्याची निवड निश्चित प्रक्रियेद्वारे केली जाईल.
पीयूष गोयल यांचा दुबई एक्स्पोमध्ये सहभाग
पियुष गोयल सध्या दुबई एक्स्पोमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईत आहे.  येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मी कालपासून दुबईमध्ये आहे आणि माझ्या मते मला असा कोणताही निर्णय (एअर इंडियाशी संबंधित) सरकारने घेतला नाही.  साहजिकच यासाठी निविदा मागवण्यात आल्या आणि आमचे अधिकारी त्याचं मूल्यांकन करत आहेत.  एक संपूर्ण प्रक्रिया आहे आणि त्यानंतर एअर इंडिया बोलीच्या विजेत्याचं नाव योग्य वेळी जाहीर केलं जाईल.
 वास्तविक, पियुष गोयल यांना टाटा समूहाची एअर इंडियासाठी निवड झाल्याच्या बातमीवर प्रश्न विचारण्यात आला.  शुक्रवारी प्रसारमाध्यमांमधील सूत्रांचा हवाला देऊन टाटा समूहाची एअर इंडियासाठी निवड झाल्याचं वृत्त आलं.  जे नंतर सरकारने नाकारलं.
 DIPAMच्या सचिवांनी केलं खंडन
 सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या कार्यक्रमाची देखरेख करणाऱ्या DIPAM (डीआयपीएएम) विभागाचे सचिव तुहिनकांत पांडे यांनी शुक्रवारीच असे अहवाल फेटाळले होते.  त्यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.
 पीटीआयच्या बातमीनुसार, पियुष गोयल यांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) सोबत प्रस्तावित मुक्त व्यापार करारावर चर्चा केली.  ते म्हणाले की, भारतीय उद्योगपतींना कापड, रत्ने आणि दागिने, फार्मा आणि आरोग्य सेवा क्षेत्रात भरपूर संधी आहेत.  सरकार दोन्ही देशांमधील व्यापाराला प्रोत्साहन देईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा