केंद्रीय मंत्री रामदास आठवले अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी उद्या बारामतीत

बारामती, २१ ऑक्टोबर २०२०: बारामती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले हे गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी बारामती तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

बारामती तालुक्यातील क-हावागज, पंचशील नगर, भागाला आठवले भेट देणार असून ते पत्रकारांना भेटणार आहेत. परतीच्या पावसाने मुसळधार वर्षाव केल्याने तालुक्यात अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांसह बारामती शहरात अनेक भागात पुराचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले बारामतीकरांचे अतोनात हाल झालेले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले बारामती तालुक्याच्या पुर पाहणी करण्यासाठी येणार आहेत. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी दिली.

यावेळी जिल्हा सचिव सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विजय डँडी सोनवणे, तालुका अध्यक्ष मधुकर मोरे, शहराध्यक्ष अभिजित कांबळे, जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनवणे, महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष रत्नप्रभा साबळे, शहराध्यक्ष पुनम घाडगे, संजय वाघमारे, निलेश जाधव उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा