कर्जत, १५.मे२०२०: छत्रपती संभाजीराजे भोसले यांची जयंती कर्जत या ठिकाणी कोरोनाच्या आजारामुळे एकदम साध्या पध्दतीने प्रतिमा पूजण करून जयंती साजरी करण्यात आली. काही तरी वेगळे करायचे म्हणून कर्जत येथे वृक्षारोपण करून जयंती साजरी करण्यात आली.
वृक्षरोपण बरोबर च प्रा.अक्षय तोरडमल आणि प्रकाशशेठ यांनी जेवरे परिसरात कोरोना विषय जनजागृती करून सॅनिटायजरचे आणि मास्क वाटत केले. निसर्गाला तेज देणारे वृक्षाच्या रोपांची ही निवड केली होती.
या मध्ये प्रामुख्याने वड, पिपळ, चिंच, लिंब, जांभुळ, आशा झाडांचा समावेश होतो तोरडमल यांनी सांगितले कि या पुढे कोणत्याही कार्यक्रमासाठी नागरिकांनी कार्यक्रम ची सुरुवात ही दिप प्रज्वलन आणि वृक्षारोपण करून साजरा करावा.
या वेळी नागरगोजे साहेब, सुजीत घोरपडे, अजित घालमे, संदेश कुलकर्णी, निखिल कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष