जॅकलिन फर्नांडिजला वाढविसनिमित्त साजिद नाडियादवाला यांच्याकडून अनोखी भेट.

नवी दिल्ली १३ ऑगस्ट ,२०२०:११ ऑगस्टला जॅकलिन फर्नांडिजने आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्त साजिद नाडियादवाला यांनी तिला अनोखी भेट दिली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते साजिद नाडियादवाला यांनी सोमवारी “हिट २०१४ ” चित्रपटाचा सिक्वेल जाहीर केला आणि त्यानंतर जॅकलिन फर्नांडिज “किक २” या चित्रपटात असल्याचे ही जाहीर केले.

ही गोड बातमी साजिद नाडियादवाला यांच्या पत्नीने सोशल मीडिया वर शेअर केली आहे. तसेच तिने सोशल मीडिया वर एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता , ज्या व्हिडिओ मध्ये जॅकलिन फर्नांडिज, सलमान खान आणि साजिद नाडियादवाला यांचे २०१४ च्या किक चित्रपटाच्या सेट्स वरील अॅक्ट्रेस डान्स करतानाचा व्हिडिओ आहे.

तसेच वर्धा नाडियादवालाने असे ही लिहले आहे की साजिद नाडियादवालाने स्क्रिप्ट लॉक केली आहे. आणि जॅकलिन फर्नांडिज साठी एक अप्रतिम रोल लिहला जाणार आहे. तसेच “किक” चित्रपटाप्रमाणे ह्या ही चित्रपटात जॅकलिन फर्नांडिज आणि सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आणि चित्रपटाच्या कास्ट आणि रिलीज तारखेविषयी पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा