कांदलगाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

इंदापूर दि.२० जानेवारी २०२१:कांदलगांव ग्रामपंचायत ने जिजाऊ जयंती व सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध स्पर्धा राबवून महिला व युवतींच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातील काळ हा महिलांचा काळ असून महिलांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडणे गरजेचे आहे.महिलांनी काळ ओळखून स्वावलंबी होणे  भविष्याच्या दृष्टीने खुप गरचेचे आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी कांदलगांव येथील कार्यक्रम प्रसंगी केले.
  
कांदलगांव ग्रामपंचायत आयोजित हळदी कुंकू व बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा पाटील,पद्मजा पाटील,पोलीस पाटील शैलजा पाटील,कांदलगांव ग्रामपंचायत सदस्य रेखा बाबर, तेजमाला बाबर,कमल राखुंडे, कोंडाबाई जाधव,सुवर्णा तुपे,माजी उपसरपंच उज्वला पाटील,अनिता पाटील,ग्रामसेवक स्वाती चव्हाण यांसह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.

अंकिता पाटील म्हणाल्या की,’ कांदलगांव ग्रामपंचायतने जीजाऊ जयंती व सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करुन महिला व युवतींच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे.महिलांसाठी “वाचन कट्टा” हा उपक्रम देखील सुरु केला आहे.यासाठी निश्चित लवकरचं वाचनीय अशी पुस्तके कांदलगांव ग्रामपंचायतीस उपलब्ध करुन दिली जातील.महिलांच्या भविष्याचा विचार करुन उभारण्यात आलेले हे ग्रंथालय असून भविष्यातील काळ हा आधुनिक काळ आहे. ग्रामसेविका व माजी जिल्हा परिषद सदस्या रुतुजा पाटील या सातत्त्याने महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात.मात्र महिलांनी काळ ओळखून याचा फायदा महिला वर्गांनी करुन घेणे भविष्याच्या दृष्टीने खुप गरचेचे आहे.
   
महिला केवळ आता चुल आणि मूल इथपर्यंत अकडून राहिलेल्या नाहीत तर त्या आता बाहेर पडायला लागल्या आहेत.भविष्यात महिलांच्या दोन हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी माझे पुढील काळात प्रयत्न असणार आहेत.मात्र त्यासाठी तुमची साथ असणं फार गरजेचे आहे. तरचं महिलांबाबतील मोठे बदल झालेले पहायला मिळतील.मोबाईल च्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे खुप काही घरबसल्या शिकता येते,त्याचा वापर त्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे.आणि पुढचा काळ आपण आपल्या प्रगतीकरिता कसा घालवू यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.महिला सबलीकरण,सशक्तीकरण, रोजगार निर्मिती किंवा वैयक्‍तिक लाभ अशा विविध योजना जिल्हा परिषद राबवत आहे.अशा कोणत्याही कामी माझे आपल्या गावासाठी कायम सहकार्य राहिल अशी मी ग्वाही देते.
कांदलगांव ग्रामपंचायतने स्वच्छता अभियांत्रिकी अंतर्गत जे वेगवेगळे उपक्रम राबवले ते कौतुकास्पद आहेत.कोरोनाच्या काळातही आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी यांनी या गावात चांगले काम केले.’

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा