रशिया १० मे २०२२ : ९ मे हा रशियाचा स्वातंत्र्य दिन अर्थात व्हिक्टरी डे. पण यंदाचा हा रशियाचा व्हिक्टरी डे सगळ्यांसाठीच अनोखा आणि वेगळा होता. हा रशियाचा ७७ वी विजय दिन होता आणि रशिया युक्रेनच्या युद्धाचाही ७७ वा दिवस होता. मॅास्कोतल्या रेड स्क्वेअरवर यावेळी लष्करी संचलन करण्यात आले. या संचलनात ११ हजार सैनिकांनी भाग घेतला तर एकुण १३१ तुकड्यांनी हे संचलन केलें.
पण रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे मात्र भाषण हे नक्कीच स्वागतार्ह नव्हते. यावेळी बोलताना पुतिन यांनी हा युक्रेनवरील हल्ला संरक्षणासाठी केला, असे म्हणून हल्ल्याचे समर्थन केले. आम्ही दुसऱ्या महायुद्धाचा धडा कोणीही विसरु नये . तसेच देशाच्या सीमेवर धोका वाढत असताना प्रतिबंधात्मक कारवाईच्या दृष्टीने लढण्याचा निर्णय घेतला असेही त्यांनी भाषणात सांगितले. जनतेला उद्युक्त करणारे हे भाष्य होते. खराब हवामानामुळे विमानाचे संचलन झाले नाही. पाश्चिमात्य देशांनी पूर्वापार मूल्यांना सोडचिठ्ठी देण्याचे ठरवले असं म्हणत त्यांनी पाश्चिमात्य देशांवर टीका केली.
रशियाच्या पोलंडमधील राजदूत सर्गेई आंद्रीव यांच्या अंगावर युक्रेन युद्घाच्या निषेधार्थ आंदोलकांनी लाल रंग फेकला. तर दुसरीकडे झेलेस्कींनी रशियाला टोला लगावत युक्रेनचा विजय होईल असे निक्षून सांगितले. आम्ही पूर्वजांचे शौर्य विसरणार नाही आणि जिंकून दाखवू म्हणत रशियाला आव्हान दिले.
रशिया युक्रेन युद्ध म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात की देशामधले वैर समोर आणण्याची सबब आहे, हे कळणे अशक्य आहे. पण या युद्धामुळे जग होरपळले जात आहे आणि जनता भरडली जात आहे हे नक्की. हे कुठेतरी थांबायला हवं, अन्यथा दुसऱ्या महायुद्धाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस