गोल पोस्ट गुन्हा रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणारी टोळीचा पर्दाफाश; तर पाचजण अटकेत

रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणारी टोळीचा पर्दाफाश; तर पाचजण अटकेत

मुंबई, २ ३सप्टेंबर २०२२: मालाड पूर्वकडील रिक्षा प्रवाशांना रात्रीच्या वेळी लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात कुरार पोलिसांना यश आले आहे. या पैकी एक आरोपी हा रिक्षा चालक असून त्याचे चार साथीदार हे मालाड कुरारगाव येथील परिसरात राहणारे आहेत.

अटक करण्यात आलेले पाचही आरोपी मित्र असल्याचे समजते. आकाश शिंदे, महेश कांबळे, सनी घोडे, राम राक्षे आणि गणेश राक्षे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. रात्री मालाड परिसरात दीनबंधू दास आणि कल्याण दुलाई हे दोघे हॉटेलच्या बाहेर रिक्षाची वाड बघत उभे होते.

ईतक्यात एक रिक्षावाला आला व त्याने कुढे जायचे साहेब असे विचारले व त्यांना रिक्षामध्ये बसवले परंतू आगोदरच चारजण रिक्षामध्ये बसले होते. काही वेळानंतर रिक्षा काही अंतर पुढे गेल्यावर त्याग चारही प्रवाशांनी दास आणि दुलाई याच्या मानेवर सुरा लावत व मारहाण करत त्याचे पैसे, माहागड्या वस्तु लुटून घेतले.

दोघांनाही रिक्षाच्या बाहेर फेकून दिले. यानंतर दोघांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांंनी अवघ्या दोन तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version