उन्नाव बलात्कारप्रकरणी कुलदीप सिंह सेंगर दोषी

नवी दिल्ली : उन्नाव सामुहिक बलात्कार प्रकरणी भाजपातून निलंबीत करण्यात आलेला आमदार कुलदीप सिंह सेंगरला न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलं आहे. सोमवारी याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने हा निकाल दिला.
दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने हा निकाल दिला आहे. १९ डिसेंबरला कुलदीप सिंह यास शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

या घटनेचा चाललेला घटनाक्रम

● ४जून २०१७ : पीडितेनं भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला.

● ११ जून २०१७ : पीडिता हरवली आणि हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

● २२ जून २०१७ : पीडितेने कोर्टात साक्ष दिली.

● ०४ एप्रिल २०१८ : पीडितेचे वडील आर्म्स अक्ट कायद्यांतर्गत अटक.

● ०९ एप्रिल २०१८ : पीडितेच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू.

● ११ एप्रिल २०१८ : उत्तर प्रदेश सरकारनं ही केस CBI ला सोपवली.

● १३ एप्रिल २०१८ : आमदाराला अटक, सीबीआयकडून चौकशी.

● ११ जुलै २०१८: सीबीआयची पहिली चार्जशीट दाखल, सेंगर यांच्यावर आरोप.

● २८ जुलै २०२९ : पीडितेच्या कारला ट्रकची धडक, २ नातेवाइकांचा मृत्यू

● ३१ जुलै२०१९ : सीबीआयकडे अपघाताची चौकशी सोपवली.

● १ ऑगस्ट २०१९ : उन्नाव बलात्कारासंबंधातले सर्व खटले उत्तर प्रदेशातून दिल्लीला वर्ग करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश.
● १६ डिसेंबर २०१९ : कुलदीप सेंगर दोषी.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा