पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत अवकाळी पावसाची हजेरी

पुणे, १२ डिसेंबर २०२२ : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मराठवाडा, विदर्भासह पुणे, पिंपरी-चिंचवड, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण असून, रविवारी (ता. ११) पण्यातील विमाननगर, चंदननगर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

तसेच जांभूळवाडी-आंबेगाव परिसरातदेखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुण्यातील ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज उरुळी कांचन, लोणी काळभोर परिसरातही पाऊस झाला.

पिंपरी-चिंचवडमध्येही बरसल्या हलक्या सरी
पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भोसरी, कासारवाडी, दिघी, पिंपळे गुरव, चिंचवड स्टेशन, चिंचवडगाव, आकुर्डी आदी भागांत पावसाने हजेरी लावली. दिवसभरात तापमानाचा कमाल पारा २४ अंशांवर होता. दिवसभर वातावरणात गारवा होता; परंतु सध्याचे हवामान आरोग्यास काही अंशी हानिकारक असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. पावसाने अचानक हजेरी लावल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. चार दिवस दिलेल्या पावसाच्या इशाऱ्यामुळे जोरदार सरी बरसण्याची शक्यता वाटत असल्याने किरकोळ विक्रेते, नागरिक भांबावून गेले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा