उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्म यांच्या हस्ते बाबा अमरनाथांची पुजा

जम्मू काश्मीर,५ जुलै २०२० : जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्म यांनी रविवारी सकाळी दक्षिण काश्मीरमधील बाबा अमरनाथांच्या पवित्र गुहेत या मौसमातील पहली आरती केली. दरम्यान बाबा अमरनाथांच्या पवित्र गुहेस त्यांनी भेट दिली आणि भगवान शिव यांना आदरांजली वाहिली.

कोविड १९ च्या नियमांच्या मर्यादेत , जम्मूहून रस्त्याने दररोज केवळ ५०० यात्रेकरूंनाच जाण्याची परवानगी दिली गेली आहे.कोविड -१९ चा प्रादुर्भाव सर्व देशभर पसरला आहे हे पाहता आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गठित कार्यकारी समितीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे ज्यात जम्मू-काश्मीरमध्ये जाणा-या सर्व व्यक्तींसाठी १०० टक्के आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे .

यावेळी राज्याचे मुख्य सचिव म्हणाले की या केंद्रशासीत प्रदेशामध्ये प्रवेश करणा-या प्रत्येक यात्रेकरूंची चाचणी करून त्यांचा अहवाल येई पर्यंत त्यांना क्वारंटीन रहावे लागेल. ते पुढे म्हणाले की पूर्वी यात्रेकरूंसाठी वापरल्या जाणार्‍या कॅम्पिंगच्या सुविधांचा वापर विशेषतः सीमाप्रवेशावर असलेले कॅम्प आता क्वारंटीन केंद्र म्हणून वापरले जाणार आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करणा-या व्यक्तींच्या चाचण्यांसाठी मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत आणि सामाजिक अंतराच्या नियमांची माहिती यात्रेकरूंनाही लागू होईल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

मुख्य सचिवांनी सांगितले की यावेळेसची परिस्थिती लक्षात घेवून यंदाची यात्रा ही मर्यादित मार्गानेच करावी लागेल.जेणेकरुन मार्गदर्शक सूचनांचे पालन करत
कोविड -१९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत ही यात्रा आपण पुर्णत्वास नेवू.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा