उरुळी कांचन, दि. ६ जुलै २०२०: उरूळी कांचन येथे दि. ६ जून २०२० रोजी हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे आज सोमवारी नागरिक मास्कचा वापर करत नसल्यामुळे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सार्वजनिक ठिकाणी बिगर मास्क भटकणाऱ्या व पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत हद्दीमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करता उभे असलेले गाडी चालवताना आढळल्यास यापूर्वी पोलीस प्रशासन व उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी आज पुन्हा मास्क न वापरता फिरणाऱ्या उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील २६ नागरिकांवर प्रशासनच्या आदेशानुसार उरुळी कांचन पोलिसांनी कारवाईचा दणका दिला. मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
ही कार्यवाही वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, व पोलीस नाईक सोमनाथ चितारे, संदीप पवार, पो. कॉन्स्टेबल अमोल भोसले, यांनी केली आहे. व कारवाई अशीच सुरू राहील नागरिकांनी बिना मास्क बाहेर पडू नये. उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रसाशन व उरुळी कांचन पोलीस कारवाई करणार असल्याने नागरिकांनी मास्क वापरावेत व विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन उरुळी कांचन पोलिसांकडून व ग्रामपंचायती कडून करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे