काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असलेल्या बॉम्बरला अमेरिकेने एअर स्ट्राइक करत केले ठार

6
काबुल, ३० ऑगस्ट २०२१: अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाजवळील निवासी भागात रविवारी संध्याकाळी हवाई हल्ला करण्यात आला.  यामध्ये एका मुलासह दोन जणांना आपला जीव गमवावा लागला.  हल्ल्यानंतर काही वेळातच तालिबान आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की अमेरिकेने एयर स्ट्राइक केली आहे.  तालिबानने सांगितले की अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात एका आत्मघाती बॉम्बरला एका वाहनात लक्ष्य केले, ज्याला काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला करायचा होता.
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात एक आत्मघाती बॉम्बरला लक्ष्य करण्यात आले.  काबूल विमानतळावर बचावकार्य सुरू असताना अमेरिकेने हा हवाई हल्ला केला आहे.  ३१ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे हे ऑपरेशन संपेल आणि आतापर्यंत त्यांनी अफगाणिस्तानातून एक लाखाहून अधिक लोकांना बाहेर काढले आहे.
 तत्पूर्वी गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर मालिका स्फोट झाले, त्यानंतर संपूर्ण जग हादरले.  यामध्ये अफगाणिस्तानातील १६९ नागरिक मारले गेले, तर अमेरिकेलाही मोठा धक्का बसला.  १३ अमेरिकन सैनिकांनीही आत्मघाती हल्ल्यात आपले प्राण गमावले.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही हल्ल्यानंतर शक्य तितक्या लवकर बदला घेण्याविषयी सांगितले.
 बायडेन यांनी पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
 गुरुवारी अमेरिकेने दहशतवादी हल्ला करणाऱ्या इसिस-के च्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.  स्फोटांच्या ४८ तासांच्या आत हवाई हल्ल्यांद्वारे दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले. दुसरीकडे, हल्ल्यानंतर अमेरिकेने पुन्हा २४-३६ तासात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली.  आता तालिबानने दावा केला आहे की अमेरिकेने हवाई हल्ल्याद्वारे काबूल विमानतळाला लक्ष्य करण्यासाठी जाणाऱ्या दहशतवाद्याला ठार केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा