स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यास अमेरिकेचे ‘द्विपक्षीय संसदीय शिष्टमंडळ’ येणार

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यासाठी अमेरिकेतून द्विपक्षीय संसदीय शिष्टमंडळ येणार आहे. या मंडळाचे नेतृत्व भारतीय अमेरिकी खासदार रो खन्ना आणि खासदार मायकल वाल्ट्ज करणार आहेत. खन्ना आणि मायकल दोघेही ‘काँग्रेसनल काँकस ऑन इंडिया अँड इंडियन अमेरिकन्सचे’ सह-अध्यक्ष आहेत, जी यूएस हाऊसमधील देशातील सर्वात मोठी द्विपक्षीय युती आहे.

हे अमेरिकन खासदार प्रथम लाल किल्ल्याचा दौरा करतील. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्राला संबोधित करणार आहेत. याशिवाय हे शिष्टमंडळ हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथील व्यावसायिक, तंत्रज्ञ, सरकार आणि बॉलिवूड कलाकारांची भेट घेतील. तसेच दिल्ली येथील महात्मा गांधी यांचे ऐतिहासिक स्मारक राजघाटाचा दौरा करणार आहेत.

शिष्टमंडळाचे नेतृत्व सांसद रो खन्ना आणि वाल्ट्ज हे करणार असून या शिष्टमंडळात सांसद डेबोरा राॅस, कैट कैममैक, श्री थानेदार, जैस्मीन काँकेट यांच्यासह एड केस हे सामिल होणार आहेत. तर सांसद रो खन्ना यांच्यासाठी ही भारत भेट खूपच खास असणार आहे. कारण त्यांचे आजोबा अमरनाथ विद्यालंकार हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. अमरनाथ यांनी महात्म्य गांधी यांच्यासोबत चारवर्ष तुरुंगात काढले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा