अमेरिका: अमेरिकेत करोना विषाणूवर प्राथमिक लस तयार करण्यात आली असून त्याच्या चाचण्या सोमवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्या स्वयंसेवकास लस टोचण्यात आली असून या चाचण्यांची सार्वजनिक वाच्यता करण्यात आलेली नाही. ‘दि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’ या संस्थेने पेरमॅनेट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिटय़ूट या सियाटलमधील संस्थेत लसीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.
या आधी सुध्धा कोरोना वर लस बनली असल्याच्या अफवा फिरत होत्या परंतु प्रत्यक्षात कोणतीही लस नव्हती. वैज्ञानिकांच्या मते या वर लस येण्यासाठी २ वर्षाचवकळवधी लागू शकतो. जगभरात या वर संशोधन चालू आहे. जरी अमेरिकेने लस शोधली असली तरी त्यावर अजून खूप परीक्षणे होणे बाकी आहे. जोपर्यंत निश्चित अशी लस तयार होत नाही तोपर्यंत कोरोनाचा धोका टाळणे शक्य नाही.
यू के ने अनोळखी पद्धत अमलात आणली आहे. त्यांच्या मते नागरिकांवर कोणतेही बंधन nahi ठेवता त्यांना मुक्त संचार करून द्यावा या मागचे कारण असे की, मानवी शरीर कोणत्याही रोगाविषयी आपली प्रतिकार शक्ती तयार करत असते. त्यामुळे त्यांचे असे मनाने आहे की कोरोना विरोधात मानवी शरीर अमुनिटी तयार करत राहील.
करोनावर उपया सुचवा; एक लाख जिंका
सध्या देशात करोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकारकडूनही करोनाला रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनावर उपाय सुचवण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. यासाठी सरकारकडून ‘COVID – 19 Solution Challenge’चं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलं आहे. यामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला १ लाखांचं बक्षिस मिळणार आहे.