अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

वॉशिंटन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संबोधिक करताना त्यांनी ही घोषणा केली. त्याचा सामना करण्यासाठी राज्यांना ५० अब्ज डॉलर्सचा निधी देणार असल्याचेही जाहीर केले आहे.
यावेळी ट्रम्प यांनी सांगितले की, “येणाऱ्या काळात आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. आता त्याग केला तर पुढे आपल्याला त्याचा फायदा होईल. पुढील आठ आठवड्यांचा कालावधी कठिण असेल.” अमेरिकेत आतापर्यंत ११०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी स्पेननही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा