अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फुकटच्या बढाया….

वॉशिंग्टन, ५ ऑगस्ट २०२०: जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे अमेरिकेत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठेपणाच्या गोष्टी केला. ज्या मध्ये त्यांनी इतर मोठ्या देशांची तुलना करत अमेरिका फार चांगल्या आणि उत्तम प्रकारे कोरोनाशी लढा देत असल्याचे म्हटले.

“मला वाटतं आम्ही खूप चांगली कामगिरी करत आहोत. चीन किंवा भारतापेक्षा आपण खूप मोठे आहोत हे विसरू नका. ट्रम्प पुढे म्हणाले करोनाशी लढताना भारताला खूप गंभीर समस्यांना सामोरं जाव लागत असून चीनमध्ये संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचेही सांगितलं आहे. भारतात सध्या करोनाचे १८ लाख ५५ हजार ७४५ रुग्ण आहेत. तर भारतातही परिस्थिती गंभीर आहे. त्याच बरोबर इतर कोणताही देश आमच्या आसपास नाही,” असे त्यांनी सांगितले आहे.

जरी त्यांनी हे विधान केले तरी तेथील जनता हि आता ट्रम्प यांच्या नेतृत्वावर समाधानी नसल्याचे पहायला मिळत आहे. तर त्यांच्या मागील काही कृत्यामुंळे आणि कोरोना परिस्थिती सरकारने व्यवस्थित न हाताळल्याने अमेरिकन जनते मध्ये नराजी व अक्रोश बघायला मिळतो आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा