गोल पोस्ट स्पॉटलाइट संगीत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना गदिमा पुरस्कार

ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना गदिमा पुरस्कार

पुणे : ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती प्रतिष्ठानातर्फे शुक्रवारी देण्यात आली.
त्याचप्रमाणे गृहिणी- सखी- सचिव पुरस्कार अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना, नव्या उभारीच्या कलाकाराला दिला जाणारा “चैत्रबन‘ पुरस्कार शास्त्रीय गायक महेश काळे यांना तर, गदिमांची कन्या प्रज्ञा उदय पाठक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा “विद्या प्रज्ञा’ पुरस्कार गायिका प्रियांका बर्वे यांना जाहीर झाला आहे.
गदिमा स्मृती पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम १४डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिरात होणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version