उस्मानाबादच्या शेतकऱ्याने मागितली गांजा पिकवण्याची परवानगी

उस्मानाबाद, दि.७ जून २०२०: राज्य शासनाकडून शेती मालाला हमीभाव देणे बंधन कारक असताना तो दिला जात नाही. त्यामुळे आमच्या शेती मालास योग्य भाव मिळत नाही. या गोष्टीमुळे आमचे कुटुंब अडचणीत आले आहे, तेव्हा आम्हाला आमच्या शेतात गांजा लागवडीची परवानगी द्यावी , अशी मागणी तुळजापूरच्या शेतकऱ्याने तहसीलदारांकडे केली आहे.

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील
शेतकरी गणेश हरिदास गायकवाड यांची गेल्या अनेक वर्षापासून कुटुंबाची उपजिवीका शेतीवरच अवलंबुन आहे.

आम्ही शेती करत असल्यापासून आजपर्यंत शेती तोट्यातच गेली आहे . उत्तराखंडच्या सरकारने २०१५ साली गांजा लागवड कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला. गांजा हा केवळ नशा करण्यासाठी नसतो , त्याचा उपयोग औषध बनवण्यासाठी सुध्दा केला जातो. देशभरातील शेतकऱ्यांना अशा प्रकारे गांजा लागवडीची परवानगी दिले तर गांजाची चोरटी शेती होणार नाही .

शेतकऱ्यांना उत्तपन्न मिळेल. दारु विक्रीतून अर्थकारण मजबूत होत असेल तर गांजा लागवडीतून शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट होईल, यासाठी महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्यावी यामुळे शेतकऱ्यांना नव संजीवनी मिळण्यास मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील . अशी मागणी या शेतकऱ्याने तहसीलदारांकडे केली. या मागणीने हा शेतकरी सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा