उत्तरं प्रदेश: देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांत हिवाळ्यात सातत्याने थंडीत वाढ होत आहे. वाढलेल्या थंडीने १९९७ पासून चे २२ वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहे. थंडीच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिल्लीसह ६ राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार यांचा समावेश आहे.
थंडीच्या हंगामात थंडीने संपूर्ण उत्तर भारत ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर दिल्ली-नोएडा, गाझियाबाद आणि फरीदाबादच्या आसपासच्या भागात हिवाळ्यातील थंडीचा कडाका सुरू आहे. मैदानी भागांमध्ये दिवसाचे तापमान १६ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी होते.
दुसरीकडे, काश्मीरमध्येही प्रचंड शीतलहरी आहे, खोऱ्यातील बहुतेक भागत शून्य डिग्री तापमानापेक्षा कमी नोंदवले गेले आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या पाइप लाइन गोठल्या आहेत या कारणास्तव पाणी पुरवठा खंडित झाला आहे. काश्मिरची स्थिती अशी आहे की जिथे जिथे पाणी आहे तेथील सर्व पाणी गोठले आहे.