गोल पोस्ट राष्ट्रीय उत्तर प्रदेश : हॉटेलला भीषण आग लागल्याने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : हॉटेलला भीषण आग लागल्याने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

उत्तर प्रदेश, ३ नोव्हेंबर २०२२: मथुरेतील वृंदावन येथील गार्डन हॉटेलला गुरुवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पहिल्यांदा हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील गोदामात आग लागली. यानंतर हॉटेलमध्ये थांबलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. या दरम्यान हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हॉटेलमध्ये एकूण २५ खोल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, ही आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांना तब्बल तीन तास लागले. या आगीमध्ये दोन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर आणखी एक कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी कर्मचार्‍याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना सीएफओ प्रमोद शर्मा यांनी सांगितले की, हॉटेलच्या गोदामाला आग लागली असून यामध्ये दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरु आहे. दरम्यान, उमेश (३० वर्षे) रा. मांट, मथुरा आणि वीरी सिंग (४० वर्षे) रा. कासगंज अशी मरण झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

error: Content is protected !!
Exit mobile version