उत्तर प्रदेश मध्ये आज लागणार बारावीचा निकाल

यूपी, दि. २७ जून २०२०: यूपी बोर्ड आज काही तासांत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थी upmsp.edu.in आणि upresults.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. तथापि, लाखो विद्यार्थ्यांच्या संख्येमुळे, वेबसाइट देखील क्रॅश होऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थी या दोन्ही वेबसाइटवर त्यांचे निकाल तपासू शकतात.

यूपी बोर्डाचा निकाल कुठे तपासाला?

> www.upmsp.nic.in

> www.upresults.nic.in

> www.upmsp.edu.in

> www.upmspresults.up.nic.in

> uttar-pradesh.indiaresults.com

> examresults.net/up

वास्तविक, कोरोना साथीच्या रोगामुळे, पेपर तपासणीची प्रक्रिया थांबविली गेली. तथापि, एकूण परिस्थिती पाहता सेफ झोन मधील तपासणी केंद्रांमधील पेपर चेक करून हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यूपी बोर्डाने १८ फेब्रुवारी २०२० ते ६ मार्च २०२० या काळात १२ वीची परीक्षा घेतली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा