लखनऊ : सर्व जगात नववर्षाचे स्वागत होत असताना मात्र उत्तर प्रदेशमध्ये एका हायप्रोफाईल कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भजन गायक अजय पाठक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील शाम ली येथे अंगावर शहारे आणणारी ही घटना घडल्याने संपुर्ण राज्य हादरले आहे
पाठक दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर त्यांच्या दहा वर्षीय अपहृत मुलाचा मृतदेहही घराजवळ आढळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अजय पाठक यांची ३६ वर्षीय पत्नी स्नेहा, बारा वर्षीय मुलगी वसुंधरा यांचे मृतदेह बंद घरात आढळले. मंगळवारी सकाळी पाठक कुटुंब स्नेहा यांच्या माहेरी जाणार होतं, मात्र सोमवारी रात्रीच हे हत्याकांड घडलं. हत्येचं कारण आणि आरोपी यांच्याविषयी अद्याप माहिती मिळाली नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.