उत्तरप्रद्रेश १३ जुलै २०२१: योगी आदित्यनाथ आणि राजकारण हे एक आगळं-वेगळं समीकरण झालं आहे. आगामी २०२४च्या निवडणुकांचं छोटं रुप २०२२च्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकांमध्ये पहायला मिळणार आहे. पण सध्या उत्तरप्रदेश धगधगतं आहे त्याचं कारण तिथली धार्मिक स्थळं आहे दहशतवाद्याच्या निशाण्यावर. राममंदिर आणि काशीयेथील धार्मिकस्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं समजलं. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन संशयित अतिरेक्यांना पकडलं गेलं. विराज अहमद आणि मसुरुद्दीन अशी या दोन आतंकवाद्यांची नावे आहेत. त्यांचा मोठा अतिरेकी हल्ला करण्याचा दावा उत्तरप्रदेश पोलिसांनी केला आहे. हे दोन्ही आरोपी अलकायदा संघटनेचे आहेत. त्यांच्याकडून दहशतवादी कारवायांबाबत लागणारं साहित्य जप्त केलं. ही झाली घटना. पण यावर राजकारण घडलचं नाही तर नवल. यावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तारे तोडत सांगितलं की मी उत्तरप्रदेशची पोलिस यंत्रणा आणि खास करुन भाजप सरकार यांच्यावर विश्वास ठेवत नाही. यावर बाकीचे गप्प बसतील तर नवल. यावर मोहसिन रजा, मंत्री उत्तरप्रदेश यांनीच त्यांना टोला मारत सांगितलं की जर यांना पोलिसांवार विश्वास नाही, तर काय यांना आतंकवाद्यांवर विश्वास आहे. पण केवळ अखिलेश यादवच नाही तर बसपाच्या मायावतीदेखील असं सांगत आहेत, की निवडणुकीपूर्वी अशा कारवाया या संशयात्मक आहे. त्यामुळे सरकारवर संशय नक्कीच आहे. एकुणात बीजेपी आणि इतर असं रणांगण जुंपल आहे. ही झाली एक घटना…
उत्तरप्रदेशची निवडणूक आता सगळ्या पार्टींसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यात आता संघांचे संचलन मध्यप्रदेशातल्या चित्रकूट येथे सुरु आहे. मोहन भागवतांसकट ५० जण यात प्रत्यक्षरित्या सहभागी झाले. तर ऑनलाईनद्वारा २५० जण यात सहभागी झाले. आगामी उत्तरप्रदेश निवडणुका आणि कोरोनाची येणारी तिसरी लाट यावर येथे पाच दिवस मंथन करत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्शवभूमीवर हा निकाल भाजपसाठी आणि संघासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. एकुणात सध्या सर्व पक्ष केवळ २०२२च्या निवडणुकीवर डोळा लावून आहे. संघ असो वा इतर पक्ष असो, भारताच्या भविष्याची ही कदाचित चाहूल असेल. त्याचबरोबर सर्व घटना या उत्तरप्रदेशातच घडत असल्याने नक्की घडतयं काय, हे पहाणं गरजेचं आणि औत्युक्याचं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस