आत्ताच स्वारगेटहून आलो. मरणाचं ट्रॅफिक. कारण काय तर मा. श्री. मोदीजी यांची सभा.
दिवसभर ऑफिसमध्ये कामं करायची. दमून घरचा रस्ता धरला तर यांच्या सभेमुळे रस्ते जाम. इथे emergency असली काय किंवा कितीही महत्वाचं काम असो यांच्यामुळे त्रास हा सामान्य जनतेलाच होतो. म्हणजे आपण यांना निवडून द्यायचं आणि यांच्यामुळे आपणच त्रास सहन करायचा. आणि हा त्रास एका दोघांचा नाही तर सर्व सामान्य जनतेचा. कित्येक बस भरून लोक घेऊन आले होते. त्यामुळे अजून ट्रॅफिक.
वा रे वा माझ्या राजकारण्यांनो….
एक त्रस्त नागरिक – धनंजय गवळी. पुणे