जिनेव्हा, २७ जून २०२१: कोरोनाचा प्राणघातक डेल्टा व्हेरीएंट आतापर्यंत सुमारे ८५ देशांमध्ये आढळलाय. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रस अधनोम यांनी आतापर्यंतचा सर्वात संसर्गजन्य व्हेरीएंट असल्याचं वर्णन केलंय. हा व्हेरीएंट लसीकरण झालेल्या लोकांना वेगानं संसर्गित करत आहे. डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी या व्हेरीएंट बद्दल चिंता व्यक्त केलीय.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत डब्ल्यूएचओचे महासंचालक म्हणाले, ‘मला माहित आहे की, कोरोनामधील डेल्टा व्हेरीएंट मूळं सध्या संपूर्ण जग खूप चिंतेत आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकारामुळं डब्ल्यूएचओची चिंता देखील वाढलीय.’ जिनेव्हा येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत टेड्रस अधनोम म्हणाले की, ‘डेल्टा हा एक अत्यंत संसर्गजन्य व्हेरीएंट आहे ज्यानं सुमारे ८५ देशांना वेढलंय. एवढंच नव्हे तर हा व्हेरीएंट लस घेतलेल्या लोकांमध्ये सुद्धा वेगानं संक्रमित होताय. डब्ल्यूएचओनं असा इशारा दिलाय की, जेव्हा आपण या महामारी विषयी नियम कमी करतो सामाजिक अंतर यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडं दुर्लक्ष करतो तेव्हा जगभरात कोरोना संसर्गाची प्रकरणं झपाट्यानं वाढू लागतात.
ते म्हणाले की, संसर्गाची गती वाढत असताना रुग्णालयात दाखल होण्याचे प्रकार वाढू लागतात. आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य कामगारांवर अधिक दबाव आहे. ही सर्व कारणं एका देशात कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूला प्रोत्साहन देण्यासाठी पुरेशी आहेत. नवीन कोरोना व्हेरीएंट संसर्गित होण्याची शक्यता जास्त आहे आणि अशी प्रकरणं सतत नोंदवले जात आहेत. हा विषाणू स्वतःच विकसित होत राहतो. पण आपण या ट्रान्समिशन वर ब्रेक लावून तयार होणाऱ्या नवीन व्हेरीएंटला थांबवू शकतो.
डब्ल्यूएचओच्या कोविड टेक्निकल लीडच्या डॉ मारिया व्हॅन कारखोव्ह यांनीही याबद्दल चिंता व्यक्त केलीय. त्या म्हणाल्या की, डेल्टा हा कोरोनाचा एक अतिशय धोकादायक व्हेरीएंट आहे आणि अल्फा व्हेरीएंटपेक्षा हा संसर्गजन्य आहे, जो युरोपसह जगातील बर्याच देशांमध्ये पसरला होता. त्या म्हणाल्या की, डेल्टा व्हेरीएंट यापेक्षा अधिक संसर्गजन्य आहे आणि त्याची प्रकरणं जगभरात झपाट्यानं समोर येत आहेत.
डेल्टा व्हेरिएंटची लक्षणे –
डॉक्टर म्हणतात की डेल्टा स्ट्रेन संक्रमित कोरोनामधील रूग्णांमध्ये श्रवणशक्ती कमी होणं, पोटा विषयी समस्या, रक्ताच्या गुठळ्या होणं, गॅंग्रिनसारखे लक्षणं दिसून येत आहेत. आत्तापर्यंत ही लक्षणं कोरोना रूग्णांमध्ये सामान्यत: दिसली नव्हती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे