आजपासून बिना नोंद करता मिळणार लस

नवी दिल्ली, २१ जून २०२१: आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून (२१ जून), देशातील १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकास कोरोना लस विनामूल्य दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशाला संबोधित करताना लसीकरण करण्याची घोषणा केली. ते म्हणाले होते की २१ जूनपासून सरकार १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीस विनामूल्य लसीकरण करेल.

काय आहे नवीन लसीकरण धोरण

नवीन लसीकरण धोरणात १८ ते ४४ वयोगटातील लोक थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात. यापूर्वी ही लस मिळविण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील लोकांना कोविन पोर्टलवर रजिस्टर करणे आवश्यक होते. परंतु नवीन धोरणानुसार १८ वर्षे वयोगटातील सर्व लोकांना केंद्र आणि राज्य सरकारद्वारे मोफत लस दिली जाईल. या भव्य लसीकरण मोहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलेल, राज्यांना यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तथापि, खासगी रुग्णालयात लस मिळण्यासाठी किंमत मोजावी लागेल.

रुग्णसंख्या घट

गेल्या २४ तासात ५८,४१९ नवे कोरोना रुग्ण आढळले. दैनंदिन नवे कोविड -१९ रुग्ण आढळण्याच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. सलग १३ व्या दिवशी १ लाखापेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली. केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहेत. भारतात सक्रिय रुग्ण संख्येतही सातत्याने घट होताना दिसत आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या आज ७,२९,२४३ आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा