वाहन चालकास सासवड न्यायालायकडून दंडाची शिक्षा

8

पुरंदर, दि.१३ जून २०२० : २०१३ मध्ये जेजुरी सासवड रस्त्यावर हयगयीने व भरधाव वेगाने चारचाकी वाहन चालवून दुचाकीला ठोकर मारून त्यावरील दोघांना गंभीर जखमी करणाऱ्या चालकास सासवड न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र, जखमींना तीन हजार रुपयांची भरपाई व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे .

याबाबत घटनेची माहिती अशी की, दि २२/१०/२०१३ रोजी ओम्नी गाडी क्रमांक एम एच १२ ए एक्स ५१३९ ,गाडी चालक राजेंद्र आनंदराव जगताप रा. बेलसर, ता. पुरंदर याने हयगयीने, अविचाराने, व भरधाव वेगाने गाडी चालवून जेजुरी सासवड रस्त्यावर लवथळेश्वर जवळ एका दुचाकीला धडक दिली . या अपघातात दुचाकी वरील निलेश तानाजी खैरे रा.टेकवडी, ता. पुरंदर व शुभम सुरेश वाघमारे रा पिसर्वे ता पुरंदर हे दोघे गंभीर जखमी झाले होते .

सदर ओम्नी चालकावर जेजुरी पोलिसांनी कलम २७९ ,३३७, ३२८,४२७ व वाहनकायदा १८४ अनव्ये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पो. हवालदार रवींद्र काळभोर यांनी केला होता. सरकारी वकील सूरज मोहिते यांनी फिर्यादीच्या बाजूने या केसचे काम पाहिले . सासवड न्यायालयाने सदर वाहन चालकास नुकसान भरपाई व दंडाची शिक्षा ठोठावली आहे .

न्युज अनकट प्रतिनिधी: