वाहन धावणार पाण्यावर!!

हैदराबाद: दिवसेंदिवस वाढत्या इंधनांच्या किमतीमुळे सामान्य माणसाच्या खिशाला चटका बसत चालला आहे. वाढलेला इंधन दरामुळे वाहन चालवावे की नाही असा प्रश्न सामान्य समोर उभा राहिला आहे. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही कारण तुमचे वाहन चक्क आता पाण्यावर चालणार आहे.
आता लवकरच तुमचे वहाणे पाण्यावर धावणार आहे असे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे. हैदराबाद मधील एका व्यक्तीने पाण्याचा वापर करून वाहन चालवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. वाहन चालवण्यासाठी पाण्याचा वापर करणारे इंजिन या व्यक्तीने शोधून काढले आहे. सुंदर रमय्या असं या व्यक्तीचा नाव आहे. यांनी तयार केलेल्या या इंजिन द्वारे एक लिटर पाण्यामध्ये सुमारे तीस किलोमीटर चे अंतर कापणी शक्य होणार आहे. त्यांनी हे पाच वर्षापासून विकसित करत असल्याचे सांगितले. प्रदूषणाच्या वाढीबरोबरच वाढत्या इंधन दराच्या त्रासापासून सामान्यना या इंजिन मुळे सुटका मिळणार आहे. या इंजिन मुळे केवळ दुचाकीच नव्हे तर तीन चाकी व चार चाकी ही वाहने चालू शकतील असे रमाया यांनी सांगितले. सुमारे तीनशे किलोमीटर चे अंतर या इंजिनच्या साह्याने वाहने कापू शकतील असे ते म्हणाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इंजिन मधून ऑक्सिजन बाहेर पडेल असे रमय्या यांनी सांगितले त्यामुळे प्रदूषण होण्याचा प्रश्‍नच उभा राहत नाही.
ते म्हणाले की, आम्ही इंजिनच्या पुढच्या ध्येयावर काम करत आहे जे असे आहे की अगदी लहान आकाराचे इंजिन एक टन वजन वाहण्याची क्षमता ठेवेल. सुंदर रमया यांच्या या तंत्रज्ञानाची ऑटोमोबाईल अभियंत्यांनी व उत्पादकांनी दखल घेतली तर ही एक मोठी उत्क्रांती ठरेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा