मुंबई : वाहन परवाना काढण्यासाठी अथवा शिकवू किंवा पक्क्या वाहन परवान्यासाठी आता प्रत्येकाला वाहतुकीचे नियम पालन करण्याची शपथ घ्यावी लागणार आहे. ही शपथ चाचणी पूर्वी दिली जाणार आहे.अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
याबाबत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना शुक्रवार (दि.१)रोजी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता त्याची अमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. तसेच परिवहन विभागाकडून अनेक नवीन नवीन योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.