वैद्यकीय सेवा देणार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची खरी गरज

जालना, दि.३१ मे २०२० : कोरोना आजाराच्या महाभयंकर परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणार्‍यांना समाजातील काही लोकांकडून त्यांचा छळ होत असल्यामुळे खाजगी रुग्णालयाची सेवा खंडीत होऊन इतर आजाराचे रूग्ण मृत्यूच्या जाळ्यात उभे ठाकले आहे.
समाजातील सर्व बाधवांनी पोलीस व वैद्यकीय सेवा देणार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन शहरातील नागरिकांकडून होऊ लागले आहे.

कोरोना आजाराच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना या काळात सेवा देणारे पोलीस व वैद्यकीय सेवेतील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांनाही सेवेच्या दरम्यान कोरोना आजाराची लागवण झाली आहे. जालना जिल्ह्यातील एकुण बाधित रूग्णांपैकी ५० ते ६० रूग्ण हे सेवेतील कर्मचारी आहेत. ज्या ठिकाणी हे लोक राहतात.

त्या ठिकाणचे व परिसरातील नागरीक त्यांच्याशी दुजाभावाची वागणूक देऊन त्यांचा छळ करीत असतांना दिसत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ज्यांनी आपला व आपल्या कुटूंबाचा जीव धोक्यात घालून कोरोना रूग्णांची सेवा केली आणि ते बाधीत झाले अशा लोकांची प्रशंसा व कौतूक केले तरी कमी आहे.

परंतु या ठिकाणी उलटे आहे. हे मात्र माणूसकीला अजीबात पटणारे नाही. वैद्यकीय सेवेतील डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांना समाजाकडून अपमानजनक वागणुक मिळत असल्यामुळे या लोकांनी खाजगी हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय सेवा खंडीत केल्यामुळे इतर आजाराच्या रूग्णाच्या आजारामध्ये वाढ होऊन ते मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे.

वैद्यकीय सेवा देणार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे आवाहन आ. कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विलास नाईक, अ‍ॅड. सुनिल किनगावकर, शहर काँग्रेस अध्यक्ष शेख महेमूद, व्यापारी महासंघाचे विनीत सहानी, गटनेते गणेश राऊत, अब्दुल मुजीब, सय्यद जमिल रिजवी, बाला परदेशी, बदर चाऊस, अहेमद नुर, मोहन इंगळे, डॉ. विशाल धानुरे, , संजय भगत, आरेफखान, आदींनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा