वैष्णोदेवी देवस्थान समिती सुरू करणार मोबाईल अॅप

जम्मू ,२३ सप्टेंबर २०२० : जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी भाविकांना १२ किलोमीटरचा चढणीचा रस्ता चालत पार करावा लागतो. मात्र बऱ्याच भाविकांना हे अंतर चालत पार करणं शक्य होत नसल्यानं दर्शन घेता येत नाही. हे लक्षात घेऊन वैष्णोदेवी देवस्थान समितीनं अशा भाविकांना घरबसल्या थेट दर्शन घेता यावं यासाठी मोबाईल अॅप सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

भाविकांच्या सोयीसाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सुचना नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी देवस्थान समितीला दिल्या होत्या. त्या अनुषंगानं देवस्थाननं या हालचाली सुरू केल्या आहेत.

याच बरोबर जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी औद्योगिक क्षेत्रासाठी १ हजार ३५०् कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं आहे. त्याबद्दल भारतीय उद्योग महासंघ आणि अखिल भारतीय व्यापार मंडळ या संघटनांच्या सदस्यांनी जम्मू इथं राजभवनात सिन्हा यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केल्याचं

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा