वंचित बहुजन आघाडीकडून आज ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक

मुंबई: केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यासाठी राज्यातील सुमारे २५ संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असल्याची माहिती मिळत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असून, यादरम्यान अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासन आणि पोलीस सज्ज झाले आहेत. १६ जानेवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्यांवर प्रकाश टाकत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

यावेळी आंबेडकर म्हणाले की, देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे.
दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही.
देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत आहे. दरम्यान, बंद दरम्यान कुणीही गोंधळ घालू नये, सर्वसामान्य व व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही तसेच, सरकारी वा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा