केजरीवाल यांच्या घराबाहेर तोडफोड

नवी दिल्ली, १४ डिसेंबर २०२०: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर तोडफोडीचं प्रकरण समोर आलं आहे. धरणेवर बसलेल्या भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, असं मुख्यमंत्री कार्यालयाचं म्हणणं आहे.

त्याचवेळी दिल्ली भाजपनं म्हटलं आहे की, ‘आप’ अत्यंत खालच्या थराचं राजकारण करत आहे. धरणेवर बसलेल्या महिला नगरसेवकांवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन सीसीटीव्ही बसविण्यात आले होते, तर मुख्यमंत्री घराच्या बाहेर आधीच बरेच कॅमेरे आहेत. कोणत्याही महिलेच्या गोपनीयतेवर हा हल्ला आहे. आपचा महिला-विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

महापौर जय प्रकाश म्हणाले की, आम्ही ७ दिवस मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आहोत, परंतु मुख्यमंत्र्यांनी भेटणं तर दूरच राहिलं त्यांनी साधी चर्चा देखील केली नाही. आज महिला नगरसेवक झोपले होते, तेथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील लोकांनी महिलांच्या गोपनीयतेची काळजी न घेता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली, ज्याचा महिला नगरसेवकांनी विरोध दर्शविला.

महापौर म्हणाले की, ‘आप पक्षानं आमच्या विषयी कोणताही वाईट प्रचार करू नये, भाजप महिला नगरसेविकांनी त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आलेले कॅमेरे तोडले आहेत.’ त्याचवेळी, भाजपच्या या उत्तरावर आम आदमी पक्षानं प्रती उत्तर देताना म्हटलं आहे की, भाजप कार्यकर्त्यांना सीसीटीव्ही पासून एवढी भीती का? सीसीटीव्ही तोडून भाजप कार्यकर्ते नक्की काय करण्याचा हेतू ठेवत आहे?

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा