नवी दिल्ली, ३० मे २०२३: भारतीय रेल्वेने स्वातंत्र्य दिनापर्यंत ‘७५ वंदे भारत’ गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्स्प्रेस १५ ऑगस्ट २०२३ पर्यत प्रत्येक राज्यासाठी सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही पहिली स्वदेश निर्मित अर्ध-हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी अनेक नवीन सोयी सुविधांनी अधयावत आहे. तसेच भारतीय रेल्वेच्या दृष्टीने ती परिवर्तनाची नांदी आहे.
राष्ट्रीय वाहतूकदार या वर्षाच्या सुरुवातीपासून दर महिन्याला निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्या सुरू करत आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये, रेल्वेने २९ मे पर्यंत सात ट्रेन सुरु केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रत्येक राज्यात नवीन युगाची ट्रेन सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. स्वातंत्र दिनापर्यंत अशा ७५ गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे.
राष्ट्रीय वाहतूकदार येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या मार्गावर निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्या सुरू करणार आहेत. रांची-हावडा, पाटणा-हावडा, मुंबई-मडगाव आणि अन्य अनेक मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडी या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. ईशान्येत दाखल झालेली ही पहिली वंदे भारत ट्रेन आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर