मुंबई : इंटरनेटवर सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन गुगलने आज एक खास डूडल तयार केलं आहे.
आजचा दिवस (२२ डिसेंबर) हा भोगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळेच हे खास डुडल तयार करण्यात आले आहे.
२२ डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला ‘विंटर सोल्सस्टाईल’ असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते.
खगोलीय घटनेप्रमाणे २१ जूनला पृथ्वी आपला गोलार्थ बदलण्यास सुरुवात करते. या दिवसापासून सूर्याचे दक्षिणायन होण्याला सुरुवात होते. हा क्रम २१ डिसेंबरपर्यंत चालतो. त्यामुळे २२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस मानण्यात आला आहे. त्यानंतर सुर्याची उत्तरायण होण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती २१ जूनपर्यंत चालत असते. हिंदू संस्कृतीमध्ये या दिवसाचे फार महत्त्व आहे. आजच्या दिवशी सूर्य पृथ्वीपासून खूप दूर असतो. शिवाय चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर फार वेळ असतो. याला इंग्रजीत समर सॉल्सटिस असं म्हटलं जातं. अनेक देशांमध्ये आजचा दिवस सणांसारखाही साजरा करतात.