मुंबई, २० ऑक्टोबर २०२२ : बॉलीवूड अभिनेता वरून धवन आणि अभिनेत्री क्रीती सेनन यांचा ‘भेडिया’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील दोघांचे लूक्स समोर आले होते, तसेच या चित्रपटाच्या टीझरलाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरचे लोक कौतुक करत आहेत. ट्रेलरमध्ये आपल्याला कॉमेडी पाहायला मिळत आहे, तर ॲक्शनही पाहायला मिळत आहे. भेडिया चावल्यानंतर वरून चे पात्र बदलून इच्छाधारी भेडिया बनल्याचे ट्रेलर मध्ये दिसून येतं आहे. त्याला त्यामधून बाहेर काढण्यासाठी क्रिति सेंनन खूप प्रयत्न करताना दिसून येत आहे.
त्याचवेळी अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियाल या अभिनेत्याची झलक आपल्याला पाहायला मिळत आहे. २ मिनिटे ५५ सेकंदाच्या या ट्रेलरवरून हे निश्चित केले जाऊ शकते, की हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे. हा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लोकांची उत्कंठा आणखी वाढलेली दिसून येते.
वरून धवन व क्रीती सेनन याचा हॉरर- थ्रिलर २५ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव